मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.
Published by :
Siddhi Naringrekar

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन.., लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फोडून सांगणारे आता: मला जाऊदे ना घरी वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र! असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com