Sanjay Raut : दिशा सालियनच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर; संजय राऊत म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात याआधी मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टमधून अनेक खुलासे समोर आले आहेत. दिशा सालियनच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे असून दिशा सालियान ही आर्थिक विवंचनेत होती. तसेच सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते. तर ते एका महिलेला पैसे देत असल्याचे क्लोजर रिपोर्टमधून समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तीगत प्रश्न आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. जे आता 5 वर्षाने त्यांच्या वडिलांना हाताशी धरुन जे राजकारण करत आहेत ते त्यांना लखलाभ होवो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे. आम्ही समर्थ आहोत, आदित्य ठाकरे समर्थ आहेत. उद्धव ठाकरे समर्थ आहेत. अशा सगळ्या विषयाचे राजकारण करुन जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करु इच्छितात आता पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात त्यांना लाज वाटायला पाहिजे हे करताना. असे संजय राऊत म्हणाले.