गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; संजय राऊत म्हणाले...

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; संजय राऊत म्हणाले...

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मंबईच्या नावासेवा पोर्ट वरून परदेशात जाणार. ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्राचा कांदा हा सडवला जातोय. त्याला भाव नाही. तिथं तुम्ही निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांना आमच्या चार पैसे कांदा उत्पादक, दूध उत्पादकांना मिळतोय म्हटल्यावर तुम्ही ताबडतोब निर्यातबंदी केली. पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो कांदा खरेदी करतो तो गुजरातला जातो.

यासोबतच राऊत पुढे म्हणाले की, गुजरातचा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका, महाराष्ट्राचा कांदा सडवा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा. हे मोदींचं धोरण. आजच माननीय शरद पवार साहेबांनी एक उदाहरण दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील गुरांसाठी गुजरातमधल्या अमूल डेअरीने चारा पाठवला आमची जनावरं जगवण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवरती गुन्हे दाखल करुन खटले चालवले. हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष. महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राची गुरं, जनावरं, पशुधन हे तडफडून मेलं पाहिजे. असं मोदी आणि शाहांना वाटते आहे. गुजरातच्या कांदा निर्यातबंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे. इकडचा शेतकरी तडफडून मेला पाहिजे पण गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे. नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून गुजरातचे प्रधानमंत्री आहेत. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com