Sanjay Raut : "प्रत्येक स्तरावर गुंडगिरी आणि गँगवॉर सुरु"
वाल्मिकच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस? असं विचारत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अशोक शंकर मोहिते हा त्याच्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहत होता. यादरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी पाहिले. यावेळी तरुणाला मोबाईलवर सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो? याचा जाब विचारून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी बेदम मारहाण केली.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्येच होते आणि त्यांनी खपवून घेणार नाही, सहन करणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांना वठणीवर आणेन अशी वक्तव्यं केलेली आहे. सुरेश धस यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा. कारण ते बाहुबली मुख्यमंत्री असे धस साहेब म्हणत आहेत.
मग बाहुबलींनी एका सामान्य अशाप्रकारे हल्ला झाला असेल, मारहाण झाली असेल तर ते मारहाण करणारे कोण आहेत? प्रत्येक स्तरावर गुंडगिरी आणि गँगवॉर सुरु आहे. हा मुद्दासुद्धा सुरेश धस यांनी मार्गी लावावा. नुसते वाल्मिक कराडचे भजन करुन चालणार नाही. असे संजय राऊत म्हणाले.