Sanjay Raut : राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा सहज वाढल्या असत्या

Sanjay Raut : राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा सहज वाढल्या असत्या

आमची आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आमची आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावर आता प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल. त्याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता. राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवले असते तर किमान 25 - 30 जागा सहज वाढल्या असत्या.

कोणतेही सरकार, कोणतीही संस्था ही बिन चेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे. हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना मतदान केलं, लोकांनी मोदींना मतदान केलं, लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं. ठिक आहे पक्ष असतो, संघटना असतात, आघाडी असते. आम्ही एकत्र बसू या विषयावर चर्चा करु. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com