ताज्या बातम्या
Sanjay Raut : 'आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाहसुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील'
राज्यात आता 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात आता 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरु झाली आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'ऑपरेशन टायगर'वरुन संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, कसलं ऑपरेशन टायगर. आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचे अख्खे दुकान खाली होईल. एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाहसुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील.
दोन तास ईडी आमच्या हातामध्ये द्या, अमित शाह मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्हीसुद्धा भोगलेली आहे. यासोबतच ते पुढे म्हणाले की, आम्ही पण सत्तेवर होतो पण एवढ्या विकृत पद्धतीने, सूड बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही. असे संजय राऊत म्हणाले.