पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईत रोड शो झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईत रोड शो झाला. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणचं रस्ते, मेट्रो बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, देशाच्या प्रधानंत्र्यांच्या रोड शोसाठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं. लोकांचे किती हाल झाले. निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कुणासाठी?

यासोबतच ते पुढे म्हणाले की, अशाप्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता. एका व्यक्तीने प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले. लोकांची गैरसोय करण्यात आली. ज्या रस्त्यावर 17 लोकांचा मृत्यू झाला तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात. यासारखी अमानुष गोष्ट नाही. असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com