रवी राणा यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले...

रवी राणा यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले...

रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. रवी राणा म्हणाले की, आधीसुद्धा संजय राऊत अंधारामध्ये होते, आतासुद्धा ते अंधारामध्ये आहेत. उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद करुन सुरु आहे. येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्विकारलेलं आहे.

येणाऱ्या काळात मोदीजींचेसुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्विकारणार आहेत. त्यांचे पाऊल टाकणं सुरु आहे. म्हणून अचानक असा झटका बसेल संजय राऊतांना की, उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसतील. असे रवी राणा म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, रवी राणा यांची जे पी नड्डा यांच्या जागी नेमणूक केली आहे का ? शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. शिवसेनेला एक परंपरा आहे. जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा ज्या व्यक्तीचे तुम्ही नाव घेतलं त्यांचा जन्मही झाला नव्हता. असे संजय राऊत म्हणाले.

रवी राणा यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले...
Ravi Rana : 'उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती'; रवी राणा यांचे मोठे वक्तव्य
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com