Sanjay Raut : रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत म्हणाले...
काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी काल एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला म्हणजे सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. रवींद्र धंगेकर चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी जे सांगितले की, विकासकामे होत नाहीत. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. म्हणून मी शिंदे गटात चाललो आहे. मला कळत नाही शिंदे गटात गेल्याने धंगेकरांची कोणती विकासकामे मार्गी लागणार आहेत? हे सरळ भितीपोटी प्रवेश चाललेलं आहेत. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक यांनी त्याच भितीपोटी पक्षांतर केलं, अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी त्याच भितीपोटी पक्षांतर केलं.
आमच्याकडून भारतीय जनता पक्षात जे लोक गेलेत त्यांनी पण त्या भितीपोटीच आणि एखाद्याने प्रवेश करावा पण जी आर्थिक कोंडी केली जाते आणि दबाव आणला जातो. रवींद्र धंगेकर खरोखर का गेले? त्यांनी सांगायला पाहिजे की, मी खरोखर विकासकामांसाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेतील एक जागा आहे ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावाने. त्या जागेची किंमत साधारण 60 कोटी रुपये आहे असे म्हणतात. ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने ही जी जागा आहे ही वफ्फ बोर्डाची आहे. असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरुन त्यांच्याविरुद्ध भाजपची लोक कोर्टात गेली आणि त्यांचे काम अडवण्यात आले. प्रतिभा धंगेकर यांच्यावर याच्यामुळे एक अटकेची टांगती तलवार निर्माण झाली. हे सगळं वातावरण तयार करण्यात आले कारण धंगेकरांनी पक्ष सोडावा.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, रवींद्र वायकर यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता त्याप्रकारे रवींद्र धंगेकरांवर होता. आता मला बघायचं आहे वफ्फ बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होणार? लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभं राहिले त्यानंतर हा दबाव सुरु झाला. असे संजय राऊत म्हणाले.