Sanjay Raut : 'एकनाथ शिंदे यांच्याबाबत शरद पवारांनी जे भाषण केलं ते ऐतिहासिक'
आज संजय राऊत - शरद पवार दिल्लीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी यांनी लिहलेल्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अजिबात रुसवा, फुगवा नाही आहे. एका विषयांमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या की, ज्या महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणते महान कार्य केलं? त्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बॅनरखाली हा कार्यक्रम घेतला गेला. लोकांचा गैरसमज झाला की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला.
पवार साहेबांसारख्या जेष्ठ नेत्याची फसवणूक झाली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तर खाजगी कार्यक्रम होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता. असं पुरस्कार खूप मिळतात. पण पवार साहेबांसारख्या व्यक्तीलासुद्धा अंधारात ठेवलं गेले. नाराजी व्यक्त करणे ही लोकशाही आहे. दोन स्वतंत्र विचारधारा आहे. आमचे एखाद्या व्यक्तीविषयीचे मत हे टोकाचे आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे. शरद पवार साहेब आणि आमचं काही भांडण नाही आहे ना. भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमचं मत मांडले. आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं आहे ऐतिहासिक आहे. असं काय महान कार्य केलं? असे संजय राऊत म्हणाले.