'शरद पवारांमुळे आघाडीमध्ये संभ्रम निर्माण...' संजय राऊत

'शरद पवारांमुळे आघाडीमध्ये संभ्रम निर्माण...' संजय राऊत

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली.
Published by  :
shweta walge

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. या बैठकीत मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाली, त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय हे खरं आहे. असा संभ्रम वारंवार निर्माण होत आहे. परंतु हा संभ्रम फारकाळ राहता कामा नये. अशा भेटींमुळे आघाडीत चिंतेच वातावरण निर्माण होत आहे. आज नाना पटोले यांनी आमची भेट घेऊन इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात चर्चा केली. अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

'शरद पवारांमुळे आघाडीमध्ये संभ्रम निर्माण...' संजय राऊत
अजित पवारांसोबतच्या गुप्त भेटीवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

दरम्यान, काल पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. यावरचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'भेट गुप्त नव्हती' असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com