महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी दोन पावलं मागे आलो; शरद पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी दोन पावलं मागे आलो; शरद पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले...

आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या. परंतु, महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी मी दोन पावलं मागे आलो. आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. असे शरद पवार म्हणाले होते.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत म्हणाले की, उद्या कोणतीही बैठक नाही. उद्या बैठक ठरली होती. पण उद्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत बैठक आहे. महाविकास आघाडी म्हणून उद्या बैठक होणार नाही. पुढील तारीख आम्ही ठरवू. अजून जागावाटपावर चर्चा सुरु झालेली नाही, शरद पवार यांचा स्ट्राईक रेट हा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. ते दहा जागा लढले आणि 8 जागा ते विजयी झाले. शिवसेना 21 जागा लढली त्यातल्या काही जागा सांगलीच्या जागेवर काँग्रेसनं, राष्ट्रवादी काँग्रेसनं कामच केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही 20 जागा लढलो. असं मी मानतो.

यासोबतच ते म्हणाले की, त्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये संपूर्ण यंत्रणा आमच्या विरोधामध्ये काम करत होती. सर्वात जास्त टार्गेट केंद्राकडून शिवसेनेला करण्यात आलं. त्याचा फटका आम्हाला बसला. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट या निवडणुकीमध्ये कुणी ठेऊ नये. आम्ही तिघे एकत्र लढलो. तिघांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. असं मी मानतो. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. आम्ही तिघे बसू. आधी बसू मग बोलू. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com