Sanjay Raut : 'वर्षा बंगला परिसरात रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा'
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? इतंक महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मुख्यमंत्री पदाचे जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचे आहे. तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाहीत? मी असं ऐकलं आहे. मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की, राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. हा काय प्रकार आहे. अख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली आहे.
माझ्या असं कानावर आलेलं आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करुन कामाख्य देवीवरुन आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत. अशी चर्चा आहे. हे खरं की खोटं आम्ही अंधश्रध्देवर विश्वास ठेवत नाही. पण चर्चा आहेत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कामाख्य देवीवरुन मंथरलेली शिंग आणली काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्रीपद दुसऱ्या कुठल्या माणसाकडे टीकू नये. असा तिकडचा कर्मचारी वर्ग सांगत आहेत. नक्की तिथे काय घडलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भिती आहे? ते अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले.