Sanjay Raut : विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलं आहेत, अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही

Sanjay Raut : विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलं आहेत, अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही

संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत.

संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. आज चंद्रहार पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईमध्ये एकत्र झालेली आहे. सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होत आहे. सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत.

महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते सगळे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगलीत अत्यंत मजबूतीने पुढे जात आहे. सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार.

यासोबतच राऊत म्हणाले की, विश्वजीत कदम काही व्यक्तीगत कारणामुळे बाहेर गेले आहेत. ते एक - दोन दिवसांमध्ये सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील. विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलं आहेत. त्यांनी अर्ज भरला आहे. अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं अर्ज भरले गेले आहेत. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com