पंतप्रधान मोदींच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान मोदींच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी त्यांच्यासमोर लोकसभेतलं विरोधी पक्षनेते म्हणून बसलेलं आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावं. त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. त्यांना आता हुकूमशाही याच्यावर राहुल गांधी यांचा लगाम येणार आहे. जर विरोधी पक्षनेता ज्याला घटनात्मक दर्जा आहे, संविधानिक दर्जा आहे. त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो त्यांचा अपमान नसून संविधानाचा त्या पदाचा अपमान आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, म्हणूनच आम्ही म्हणतो की, संविधान खतरे मे है. मोदी कोणत्याही प्रकारचे संविधान, घटना, नियम पाळायला तयार नाही. आम्ही जे म्हणतो की, संविधान खतरे मे है. ज्या बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्याने तुमचं बहुमत गमवायला लावलं. याची अस्वस्थात आपण समजू शकतो. असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com