राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...
Published by :
Siddhi Naringrekar

राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, काल राहुल गांधी यांचे भाषण देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होते. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला. राहुल गांधी यांनी काल काय चुकीचं सांगितले.

राहुल गांधी यांनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या तोंडावर सांगितले की, हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेतलेला नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाची व्याप्ती, हिंदुत्वाचा विचार खूप मोठा आहे. जो तुम्हाला कधी समजला नाही. नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले.

यासोबतच संजय राऊत पुढे म्हणाले की, कालच चित्र फार विचलीत करणारे होते. 10 वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये ओम बिर्ला यांच्याकडे संरक्षण मागावं लागले. कालपर्यंत यांच्यापासून आम्हाला संरक्षण मागावं लागत होते. एवढी यांची हुकूमशाही आणि दादागिरी होती. पण राहुल गांधींनी काल त्यांना संसदेमध्ये गुडघ्यावर आणलं. असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com