रवी राणांनी केलेल्या ठाकरेंबाबतच्या 'त्या' दाव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

रवी राणांनी केलेल्या ठाकरेंबाबतच्या 'त्या' दाव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

रवी राणांनी केलेल्या ठाकरेंबाबतच्या दाव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Published by :
Siddhi Naringrekar

नवनीत राणा माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली, ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंसाठी उघडी ठेवलेली आहे. त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल. हे खऱ्या अर्थाने काळा दगडावरची पांढरी रेघ आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कोण रवी राणा? त्यांचा राजकारणाशी संबंध आला कधी? शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला जुना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. उद्धव ठाकरे 25 वर्षापेक्षा जास्त काळ या पक्षाचे नेतृत्व करता आहेत. या पक्षाचे स्वत:चे 18 खासदार सध्या निवडून आलेलं आहेत. परत निवडून येतील.

यासोबतच ते म्हणाले की, अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी बोलावं हे बरोबर नाही. तुमचं तुम्ही बघा. तुम्ही तुमच्या निवडणुका लढा. ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका. आमच्या भूमिका काय आहेत त्या आम्ही ठरवतो एकत्र बसून. त्यासंदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतात. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com