Sanjay Raut : पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे

Sanjay Raut : पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश असे अजित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश असे अजित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणाले आहे की, राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्यादिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचा विचार करतो. 

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला. त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळसरळ केलेलं पक्षांतर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता.

यासोबतच संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा महाराष्ट्रद्रोह उफाळला नसता तर बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेंना मिळाली नसती. त्यामुळे जरा जपून बोला लोक ऐकतायत आणि लोकांना समजत आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com