Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं” - संजय राऊत

ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट नेहमीच एकमेकांवर आरोप करताना दिसतात.

ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट नेहमीच एकमेकांवर आरोप करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर आता , शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचं मन जिंकलं आहे. त्यामुळेच सर्व आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यावेळी काय झालं हे मी सांगणार नाही. कारण ते मी मनाच्या कोपऱ्यात दडवून ठवलं आहे. त्यामुळे एक ते दोन दिवस जाऊ द्या. ज्यावेळी मी बोलेन तेव्हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजणार .तसेच ज्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी लढा दिला. ते लोक इतक्या सहजासहजी शिवसेना सोडून जाणार नाहीत. तसेच निश्चितपणे काहीतरी घडल्याशिवाय आमदार शिवसेना सोडणार नाहीत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास आम्ही आणि शिवसेना एकत्र येण्याला वेळ लागणार नाही. असे वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत खासदार संजय राऊत म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनीही म्हटलंय की माझ्या गटातले लोकं माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. त्यांच्या गटात काय वाद सुरू आहेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. “दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करायला हवं. तसेच “दीपक केसरकर यांनी एकत्र येण्याची केलेली भाषा हे त्यांच्या गटातील वैफल्य आहे. मी फ्रेब्रुवारीमध्ये सरकार पडेल, असे बोललो होतो. त्यामुळेच केसरकर आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत. लवकरच १६ आमदार अपात्र ठरतील. आमची कायदेशीर बाजू भक्कम आहे” असे राऊत म्हणाले.

हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, हा गटही टीकणार नाही. यापैकी बरेच लोकं भाजपात प्रवेश करतील. तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना आता शिवसेना स्वीकारणार नाही असे म्हणत राऊत यांनी केसरकरांना प्रतिउत्तर दिले आहे.

Sanjay Raut
…तर आम्ही आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ? शिंदे गटाच्या या मंत्र्यांने केलं मोठे वक्तव्य
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com