नागपुरात ठाकरे फडणवीस भेट, 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा? संजय राऊत म्हणाले...

नागपुरात ठाकरे फडणवीस भेट, 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा? संजय राऊत म्हणाले...

हिवाळी अधिवेशन सुरु आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिट चर्चा झाली. मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब देखील उपस्थिती होते. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, जोरदार चर्चा करायला काहीच हरकत नाही. पण महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत. विधीमंडळाचे सदस्य आहेत. ते नागपूरला गेलेले आहेत. नवीन सरकार स्थापन झालेले आहे. प्रचाराच्या व्यासपीठावरच्या ज्या तोफा असतात त्या थंड पडलेल्या आहेत.

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचे काम करावे. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणाचे काम करावे, अशा शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री गेले असतील तर त्यात फार मोठी खळबळ माजण्याचे कारण नाही. किंबहुना देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा ही त्यांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करुन त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. ही पद्धत आहे महाराष्ट्राची. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com