Sanjay Raut : "लालकृष्ण अडवाणींची अवस्था शहाजहानसारखी..."
सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. त्याचप्रमाणे लालकृष्ण आडवाणी यांच्यावरुनही सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत भाष्य करताना म्हणाले की, "तुम्हाला करीना कपूरचा मुलगा तैमुर चालतो. त्यावेळी तुम्हाला हिंदुत्व दिसत नाही".
तसेच पुढे ते म्हणाले की, "लालकृष्ण आडवाणींची अवस्था शहजाहानसारखी झाली आहे. त्यांना पाहिलं की कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हिंदुत्त्वाची मुहूर्तमेढ लालकृष्ण अडवाणींच्या काळात रोवली गेली. मात्र आता औरंगजेबाच्या कबर प्रकरणावरुन ते आत आहेत".
औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही. औरंगजेबाचे थड़गे हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे. तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत. थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला. तो त्यांच्याच मानगुटीवर बसला'', अशी टीकाही त्यांनी केली.