Sanjay Raut
Sanjay Raut

लोकशाहीचा कोणी मुडदा..., सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे.

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यातच आता सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे. त्या सुनावणीकडे आमचे बारीक लक्ष होते. स्वतः उद्धव ठाकरे यांचे देखील याकडे लक्ष ठेवून होते. मी सुद्धा बारीक लक्ष ठेवून होतो. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काही निरीक्षने नोंदविल्याचाही उल्लेख संजय राऊतांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून फुटीर गटाचे नेते, नारायण राणे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते वारंवार सांगत आहे की निकाल आमच्याच बाजूने येईल असे म्हणत आहे. त्यावर न्यायालयासमोर तुमच्या काय बैठका झाल्या आहे का ? संजय राऊतांनी थेट प्रश्न शिंदे गटासह भाजपला केला आहे. यावरून संजय राऊत म्हणाले देशातील न्याय मेलेला नाही, लोकशाहीचा कोणी मुडदा पाडू शकत नाही. न्यायालयावर आमचा विश्वास आहे, शिवसेना ही ठाकरे यांची आहे हेच सिद्ध होईल. तारखा आणि सुनावण्याचा घोळ घालायची गरज काय आहे. न्यायालयाने सांगायला हवं की निवडणुका घ्या आमची तयारी आहे असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

Sanjay Raut
Supriya Sule : एसटी कर्मचारी आत्महत्येस सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं जबाबदार

दरम्यान, निर्णय स्पष्ट आणि पारदर्शक यावा अशीच आमची अपेक्षा आहे. कुणीही उठून पक्ष फोडतो आणि सरकार पाडतो यामुळे वातावरण गढूळ झाले आहे. सत्य आमच्या बाजूने आहे आणि सत्यमेव जयते आहे. त्याप्रमाणे आमचाच विजय होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com