एकनाथ शिंदेंच्या भाषणातील ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत म्हणाले, “कशाला स्वत:ची अब्रू…
Admin

एकनाथ शिंदेंच्या भाषणातील ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत म्हणाले, “कशाला स्वत:ची अब्रू…

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान दिले होते.

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंना शिंदे गटाने ठाण्यात लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. त्यावर आदित्य ठाकरेंनी या आव्हानाला होकार देत पुन्हा चॅलेंज दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होते. या दोघांचा कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री भाषण करतानाचा एक व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना राऊतांनी लिहिले की, “मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..३२ वर्षांचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?” असे राऊत म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com