Sanjay Raut , Uaddhav Thakare VS Sanjay Shirsat : "संजय राऊत जे बोलतील त्याला उद्धव ठाकरे म.. म..."

उद्धव ठाकरे यांच्यावर संजय शिरसाटांची बोचरी टिका: 'संजय राऊत जे बोलतील त्याला म.. म...'
Published by :
Team Lokshahi
Summary

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला गेला. या प्रकरणातील पकडला गेलेला आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली. पण आता याच हल्ल्याचा मास्टरमाइंड आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणले गेले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत असतानाच आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टिका केली.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, " 26/11 च्या हल्लातील आरोपीला हे सरकार सोडणार नाही. त्या आरोपीवर कारवाई केली जाईल. संजय राऊत धृतराष्ट्र बोलतात उद्धव ठाकरे ऐकतात. त्यांना या सत्य परिस्थितीची जाणीव करुन दिली पाहिजे. उद्धव ठाकरे गट डबघाईला आला आहे. ठाकरे गटाचे नाव घेतले की, लोकं नको नको म्हणतात. त्याचप्रमाणे सध्या गटामधून आउटगोइंग चालू आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंवर काळी जादू केली आहे. त्यामुळे संजय राऊत जे बोलतील त्याला 'म..म..' करण्याची भूमिका उद्धव ठाकरे करत आहेत. कॉंग्रेसने त्यांच्या काळात देशाला भिकारी बनवले. आता त्यामधून बाहेर काढण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत. गरिबी हटवण्याच्या नादात त्यांनी लोकांना हटवण्याचे काम केले. म्हणून आता तोंड लपवण्याची गरज भासत आहे. कॉंग्रेस ही इंग्रजांची दुसरी औलाद आहे". असं संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com