Sanjay Raut: "हातात बेड्या घालून परदेशी नागरिकांना पाठवलं जात नाही" संजय राऊतांचा सरकारवर आरोप!
बुधवारी अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरच्या श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, अमेरिकेतून 104 बेकायदा भारतीय स्थलांतरितांची पाठवणी करण्यात आली आहे. या स्थलांतरित लोकांमध्ये 30 पंजाबचे, हरियाणा तसेच 33 गुजरातचे आणि उत्तर प्रदेश तसेच चंडीगडचे 2 ते 3 स्थलांतरित आहेत.
यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या भेटीत स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. याचपार्श्वभूमिवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, एवढा महानदेश आणि या देशाचे महान पंतप्रधान त्यांना अमेरिकेसमोर शरणांगति पत्कारावी लागली. भारताची इज्जत काय हे अमेरिकेनं दाखवून दिलं आहे. टिपोर्ट करणाऱ्या भारतीयांना अमानूष वागणूक दिली गेली. भारताच्या हद्दीतही भारतीयांना बेड्या लावणं हे गंभीर आहे. भारतीयांना हातात बेड्या घालून अतिरेक्यासारखं मायदेशी पाठवण्यात आलं. नरेंद्र मोदींचं हे मोठं अपयश आहे.
