Sanjay Shirsat On Jayant Patil: जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट, संजय शिरसाट म्हणाले...
संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. यादरम्यान त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. संजय शिरसाट यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. जयंत पाटील जास्त काळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत राहण्याच्या मनस्थितीत नाही तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची मोठी शक्यता संजय शिरसाट यांनी सांगितली आहे.
तर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची मंत्रिपदाची खंत वरिष्ठांकडे व्यक्त करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्याचसोबत आनंदाचा शिधा बंद होणार नसून सोमवारी निर्णय होईल अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. मात्र संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या गोप्यस्पोटामुळे राजकारणातून काय पडसाद पडतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान संजय शिरसाट म्हणाले की,"पहिलाच वक्तव्य केल होत की, ते जास्त काळ राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तुम्हाला एक सांगतो, लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप येईल जयंत पाटील हे तुम्हाला लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामिल होताना दिसतील. डेरिंग जरुर करु सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे नेते सोबत असतील तर, डेरिंग करायला काही हरकत नाही".
"ते अर्थमंत्री राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा अनेक अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. त्यांना परिस्थितीची जान आहे. कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा याची देखील त्यांना जान आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा योग्य वेळ आली की, तो निर्णय घेऊ".