अल्विश यादव प्रकरणी संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले 'राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर...'

अल्विश यादव प्रकरणी संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले 'राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर...'

अल्विश यादव वर काही लोकांनी आरोप करायचा प्रकार केलेला आहे. मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असं स्वतः यादवने सांगितल आहे. हिंदुत्वावर बोलणारा लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर कुठलेही आरोप करून त्याला कुठल्याही बाबीत अडकवायचं हा प्रकार काही लोक करत आहेत.
Published by :
shweta walge

अल्विश यादव वर काही लोकांनी आरोप करायचा प्रकार केलेला आहे. 'मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा' असं स्वतः यादवने सांगितल आहे. हिंदुत्वावर बोलणारा लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर कुठलेही आरोप करून त्याला कुठल्याही बाबीत अडकवायचं हा प्रकार काही लोक करत आहेत. राऊत आणि त्यांच्या उबाटा गटाने हिंदुत्व तर सोडलेलच आहे, परंतु हिंदुत्वावर जो बोलेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी हे लोक करत आहेत. मला वाटतं हे चुकीचं आहे. तो जर आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. कधीही आम्ही त्याचं समर्थन करणार नाही परंतु बळजबरी आरोपी बनवणं हा जो काही प्रकार सुरू केलेला आहे हे बरोबर नाही म्हणून आम्ही त्याच समर्थन करत नाही. पण जर तो आरोपी नसेल तर निश्चित आम्ही त्याचं समर्थन करू, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत. ते मीडियाशी संवाद साधत होते.

काय म्हणाले संजय शिरसाट?

आजकाल संजय राऊत यांना लोकांचा काय काय पाहायचं असतं, स्वतः राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे हे जर आम्ही बोललो तर मग तुम्हाला कळेल कोणत्या हॉटेलवर राऊत थांबल्यावर त्यांच्या हॉटेलची बिल कोण भरायचं, जे आज तुमच्या नावाने रडताय तेच तुमच्या हॉटेलची बिल भरायचे. कृपया राजकारणामध्ये वैयक्तिक गोष्टींवर जाऊ नका, ड्रग्स सेवन कुठेही कुठल्याही खासदाराने केलेलं नाही त्याबद्दल तुम्ही जो गैरसमज पसरवत आहात तो चुकीचा आहे. आपलं झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर त्याचं पुरावा सहित चोक उत्तर दिले जाईल हॉटेलच्या नावासहित रूम नंबर सहित सर्व देऊ शकतो. असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

ललित पाटील प्रकरण

ललित पाटील सह 14 लोकांवर कारवाई केलेली आहे, ते आता दहा वर्ष तरी सुटणार नाहीत आणि त्या भीतीपोटीस तो पळाला हे त्याने कबूल केलेलं आहे, म्हणून अशा ड्रग्स माफियाच्या मागे जो कोणी असेल मग तो आमदार असो खासदार असो का मंत्री असो त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची आहे, आम्ही स्वतः ती मागणी करतोय, समाजाला बिघडवणारा कोणताही ड्रग्स माफीया असला तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्याच्या संबंधित जरी कोण असला त्यालाही जेलमध्ये टाकलं पाहिजे हि स्पष्ट भूमिका शिंदे सरकारची आहे

अडीच वर्ष पैसे घेणं हाच त्यांचा धंदा होता, पैसे घेऊन हा सर्व कारभार ते चालवायचे म्हणून ते सर्वसामान्यांना भेटत नव्हते ( उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला ) सर्वसामान्य माणूस काही देत नव्हता आणि हे देत होते, आपला संबंध कोणाशी असावेत, जो इन्कम देणार असावा आता त्यांची दुकानदारी बंद झाल्याने त्यांच्यावर असलेले आरोप बेफान होऊन ते दुसऱ्यांवर करत आहेत

हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र कधी उडता पंजाब होऊ शकत नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, काही लोकांना ही मळमळ आहे म्हणून ते महाराष्ट्राचे नाव बदनाम करत आहेत, राजकारण करत असताना तुम्ही एखाद्यावर टीका करणे ठीक आहे पण महाराष्ट्राची बदनामी करू नका हे त्यांना सांगणं आहे

मुख्यमंत्र्यांची नाराजी

मुख्यमंत्री हे नाराज नाही झाले, सरकारची असलेली भूमिका, सरकार करत असलेले प्रयत्न हे सर्व सामान्य जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवावा, काही लोक अशा वेळेला आग लावण्याचा काम करत आहेत त्यांना पाठिंबा देण्याची आपली भूमिका नसावी तर आपली भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली तर त्यांना खऱ्या अर्थाने आपले सरकार जे काही काम करत आहे ते कळेल म्हणून आपण आंदोलन करण्यापेक्षा सरकार काय करतय हे शिंदे साहेबांचं मत होतं

अल्विश यादव प्रकरणी संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले 'राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर...'
एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल, कारण काय?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com