Admin
बातम्या
विधानभवनात जे काही आमदार येत आहेत याचा अर्थ काहीतरी नवीन घडणार हे निश्चित - संजय शिरसाट
राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांची नाराजी आणि आमची सुप्रीम कोर्टातील केस याचा काहीही संबंध नाही. त्यांचा मुलगा पार्थ पवार यांचा झालेला पराभव तेव्हा पासून ते नाराज आहेत. नाराजीच्या खेळामध्ये त्यांचा मोहरा बनवला जात आहे. असे संजय शिरसाट म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, अजित दादांना आता ncp मध्ये राहायचे नाही आहे. दादांनी एनसीपी सोडली तर आम्हाला आनंद आहे. विधानभवनात जे काही आमदार येत आहेत याचा अर्थ काहीतरी नवीन घडणार हे निश्चित आहे. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व अजित पवारांना मान्य नाही आहे. असे संजय शिरसाट म्हणाले.