महाविकास आघाडीची ही शेवटची वज्रमूठ सभा; आमदार संजय शिरसाट यांचा दावा
Admin

महाविकास आघाडीची ही शेवटची वज्रमूठ सभा; आमदार संजय शिरसाट यांचा दावा

महाविकास आघाडीची ही शेवटची वज्रमूठ सभा
Published on

सचिन बडे, छत्रपती संभाजीनगर

मुंबईत झालेली महाविकास आघाडीची सभा ही शेवटची होती, यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार नाही, अस वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलय. आज झालेल्या सभेत नागरिकांना आणि स्टेजवर असलेल्या लोकांना बोर झालं होत असे म्हणत संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर टीका केलीय.

तसेच या सभेत कुठलाही दम नव्हता, इतर नेत्यांच्या भाषणामध्ये देखील काही दम दिसला नाही, त्यांनी पुढच्या सभेची घोषणा केलेली नाही, यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही शेवटची सभा होती, यानंतर सभा होणार नाही असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय.‌

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com