संजय राऊतांची शरद पवारांवर नाराजी, संजय शिरसाट म्हणाले 'जागतिक स्तरावर जोडे मारुन...'
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'महादाजी शिंदे' पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना दिला गेला. तसेच हा पुरस्कार दिल्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुकदेखील केले.
या सगळ्या प्रकारावर संजय राऊत यांनी नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच चर्चा निर्माण झाली. यावरुन संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, "शरद पवार यांनी कोणत्या कार्यक्रमाला जावं आणि जाऊ नये हे संजय राऊत ठरवणार का? राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पे रोलवर आहेत. मालकांबद्दल आस बोलायचं नाही. शरद पवारांनी तुम्हाला खुर्ची दिली. त्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत अडीच वर्ष काढू शकलात. संजय राऊतांचे जागतिक स्तरावर जोडे मारुन स्वागत झाले पाहिजे". असे संजय शिरसाट म्हणाले.