Sanjay Shirsat : लोकशाही मराठीच्या 'ग्लोबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात संजय शिरसाट यांची मोठी घोषणा
लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी आज भव्य संमेलन पार पडत आहे. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली. याचपार्श्वभूमिवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी इंदू मिल लोकार्पण कोणत्या दिवशी होईल याची माहिती दिली आहे.
इंदू मिल लोकार्पण कधी? काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट
इंदू मिलमध्ये मी गेलो होतो तेव्हा सर्वाधिकारी होते सर्व पाहणी केली. काम व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचा चालू आहे. मी अधिकाऱ्यांना विचारलं की टार्गेट काय आहे कधीपर्यंत होईल. त्याने सांगितलं डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. मी म्हटलं नक्की होईल पण म्हटलं एखादा महिना पुढे जाऊ शकतो. मग म्हटलं फेब्रुवारी. मी त्यांना म्हटलं की स्टोरी मार्च आणि एप्रिल आणि दहा एप्रिल पर्यंत मला हे पूर्ण झालेला पाहिजे...हे त्यांचे कमिटमेंट आहे माझी नाही. आणि मग मी म्हटलं 10 एप्रिल पर्यंत त्याचा उद्घाटन सोहळा पार पडू.
उद्या मी दिल्लीला जातो आहे जे पुतळा बनवत आहेत त्यांच्याकडे जातो आहे. संपूर्ण ताकद टेक्निकल टीमने त्यामध्ये झुकून दिली आहे. मी सर्व पाहिलं अभ्यास केला तेव्हा बाबासाहेबांच्या बुटाची टाच त्या पुतळ्याची सव्वा सहा फूट फक्त टाच आहे. इतका भव्य दिव्य तो पुतळा आहे. हे स्वप्न भारतासाठी फार महत्त्वाचा आहे. इतक्या मोठ्या उंचीचा पुतळा आपल्या मुंबईत होतो आहे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे...
येत्या 12 ते 13 तारखेला हिंदू मिलचा लोकार्पण होईल...तृतीयपंथी यांच्याकडे इतक्या डिग्र्या आहेत की आमच्याकडे त्या डिग्री असत्या तर आम्ही कुठच्या कुठे असतो...अनाथ मुलांचे आश्रम जे असतात त्यामध्ये मला काम करायची इच्छा आहे. अठरा वर्षा पूर्ण झाली की मुलांना बाहेर जावं लागतं ह्या नियम आहे. त्या अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचं काय होतं हे कोणी पाहत नाही त्यामुळे यावर सुद्धा काम करायचे माझी इच्छा आहे...