Sankarshan Karhade :"आकाशातल्या देवा आभार, तू जमिनीवरचा देव दावला" पोस्ट करत संकर्षणने व्यक्त केला क्रिकेटच्या देवाबद्दलचा आदर
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये संकर्षण कऱ्हाडेचे नाव घेतले जात आहे. संकर्षण कऱ्हाडे नेहमीच चाहत्यांना आपल्या पोस्टमधून किंवा कवितेमधून भेटीस येतो. आपल्या मनातील भावना कवितेतून चारओळीतून किंवा कॅप्शनमधून संकर्षण मांडत असतो. नुकतीच त्यांने एक पोस्ट सोशलमीडियावर टाकली आहे. ज्यामध्ये तो एका महान व्यक्तीला भेटून आपल्या मनातील भावना कॅप्शनमध्ये व्यक्त केल्या आहेत.
संकर्षण कऱ्हाडेने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांची भेट झाली होती. संकर्षण पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये सुत्रसंचालनासाठी गेला असता, त्यावेळी त्याची भेट सचिन तेंडुलकरसोबत भेट झाली. संकर्षणने सचिन सोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संकर्षण भावना व्यक्त केल्या आहे.
कॅप्शनमध्ये संकर्षण लिहितो की, आज पुण्यात चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली पाहुणा कोण होता…? साक्षात “क्रिकेटचा देव" या वाक्यामुळे संकर्षणच्या मनात सचिन तेंडुलकरबद्दल आदर दिसत आहे.
पुढे संकर्षण लिहितो की, भारतरत्नं सचिन तेंडूलकर सोबत ५ मिनिटं शांतपणे बोलता आले...ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात घेता आला … जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आला ..भारतरत्नं असलेल्या सचिन सोबत २ तास मंचावरती ऊभं राहाता आलं या वाक्यातून समजत आहे की संकर्षणचे क्रिकेटबद्दलचे प्रेम दिसत आहे.
पुढे संकर्षण लिहितो की, "ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदूस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनात आहेत त्या सांगता आल्या अजुन काय पाहिजे ...आकाशातल्या देवा आभार तू जमिनीवरचा देव दावला या कॅप्शन आणि पोस्टला क्रिकेट रसिकांकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.