Sankarshan Karhade : संकर्षण कराडेची 'ही' भावनिक फेसबुक पोस्ट व्हायरल;
Sankarshan Karhade : संकर्षण कराडेची 'ही' भावनिक फेसबुक पोस्ट व्हायरल; परभणीतील रंगमंचाच्या दयनीय अवस्थेबाबत व्यक्त केली खंत Sankarshan Karhade : संकर्षण कराडेची 'ही' भावनिक फेसबुक पोस्ट व्हायरल; परभणीतील रंगमंचाच्या दयनीय अवस्थेबाबत व्यक्त केली खंत

Sankarshan Karhade : संकर्षण कराडेची 'ही' पोस्ट व्हायरल; परभणीतील रंगमंचाच्या दयनीय अवस्थेबाबत व्यक्त केली खंत

संकर्षण कराडेची भावनिक पोस्ट व्हायरल; परभणीतील रंगमंचाच्या दयनीय अवस्थेबद्दल खंत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Sankarshan Karhade Instgram Post : लेखक, अभिनेता, कवी लेखक संकर्षण कराडे याने पोस्ट केलेली पोस्ट सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. त्या पोस्टमधून मराठी रंगभूमीवरील कलाकारांच्या व्यथा आणि व्यासपीठाच्या दुर्दशेबाबतचा सूर उमटत आहे.

संकर्षण सध्या त्याच्या "कुटुंब किर्रतन" या व्यावसायिक नाटकाचा प्रयोगासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहे. यामध्ये नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे नाटकाचे प्रयोग सादर होत आहे. परंतू आपण परभणीचे सुपुत्र असून सुद्धा आपल्या गावात नाटकाचा प्रयोग सादर करता येत नसल्याने त्याने आपली खंत व्यक्त केली आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे परभणीतील रंगमंचांची बिकट अवस्था आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये संकर्षण लिहितो की, “ज्या गावात कलाकृतींची आणि कलाकारांची समृद्ध परंपरा आहे, तिथे स्थानिक कलाकारांचे व्यावसायिक नाटक सादर होऊ शकत नाही, ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे,” “एरव्ही अभिमानाने म्हणतो की,‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी.’ पण आज परभणीतील नाट्यमंदिरांची अवस्था पाहून दुःख होतं.”असं कराडे यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

प्रशासनाकडून या विषयाकडे दुर्लक्षही होत असल्याचे त्याने अधोरेखित केले आहे. हे केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून कलाकारांच्या भावना दुखावणारी परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अलीकडेच अभिनेते परेश रावल यांनी मराठी रंगभूमीच्या परंपरेचे कौतुक केले होते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रंगमंचांच्या झालेल्या दुर्दशेमुळे ही गौरवगाथा फक्त शब्दांतच मर्यादित राहते, हीच खंत अनेक कलाकार सातत्याने व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी ग्रामीण भागांतील नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. रंगभूमीवरच्या व्यावसायिक प्रयोगांमध्ये ही एक मोठी अडचण ठरते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com