ताज्या बातम्या
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातल्या ग्रामपंचायती आज बंद राहणार
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातल्या ग्रामपंचायती आज 9 जानेवारीला बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेने याची घोषणा केली आहे.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी सरपंच परिषद आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे. सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी, तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत आज काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.