शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; 20 मार्चला संसदेबाहेर 'किसान महापंचायत'
Admin

शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; 20 मार्चला संसदेबाहेर 'किसान महापंचायत'

कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनेने किमान आधारभूत किमतीच्या अनुषंगाने हमीभावाचा कायदा करण्याची मागणी सातत्याने केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनेने किमान आधारभूत किमतीच्या अनुषंगाने हमीभावाचा कायदा करण्याची मागणी सातत्याने केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता 'संयुक्त किसान मोर्चा' शेतकरी संघटनेची गुरुवारी (9 फेब्रुवारी) बैठक झाली.प्रथम 20 मार्च रोजी दिल्लीत महापंचायत होणार आहे. यानंतर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल. असे सांगण्यात आले आहे.

बैठकीत संयुक्त किसान मोर्चाने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर टीका करत यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे.युधवीर सिंह, राजा रामसिंह आणि डॉ. सुनील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत अनेक शेतकरी संघटनांनी या विषयावर चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्यास भाग पाडलं जात आहे. यामध्ये 20 मार्च रोजी देशभरातील शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत. यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. सरकारने दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही. अशा परिस्थितीत प्रथम 20 मार्च रोजी दिल्लीत महापंचायत होणार आहे. यानंतर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल. असे युनायटेड किसान मोर्चाचे ज्येष्ठ नेते युधवीर सिंह यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com