Saptashrungi : सप्तशृंगी गडावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती, प्रशासनाची तारांबळ
सध्या नाशिक येथे चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रशासनाची एकच खळबळ निर्माण झाली. बुधवारी रात्रीपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रशासन, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाची एकच तारांबळ उडाली.
आदिमायेचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून दर्शन मार्गात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी लहान मुले, वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागला.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह -
देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर सप्तशृंगीच्या पायथ्याशी पहिल्याच पायरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. याआधी गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने बैठकादेखील घेतल्या. मात्र बैठकीत झालेल्या नियमांची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे वाढलेल्या गर्दीचे नियोजन करणे आवश्यक असताना प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.