पुण्यात होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य अधिवेशनासाठी सातारा मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद सज्ज

पुण्यात होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य अधिवेशनासाठी सातारा मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद सज्ज

300 हुन अधिक पत्रकार पिंपरी चिंचवडच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचा निर्धार

प्रशांत जगताप, सातारा : पिंपरी चिंचवड येथे होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी सातारा मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद सज्ज झाली असून अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातील 300 हुन अधिक पत्रकार उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्यउपाध्यक्ष शरद काटकर ,जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी साताऱ्यात दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि डिजिटल मीडिया परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सातारच्या सर्किट हाऊस येथे अधिवेशनाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व वरिष्ठांनी बैठकीस मार्गदर्शन करून सातारा जिल्ह्यातील 11 ही तालुक्यात कार्यरत असलेल्या मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या पत्रकार सदस्यांना मोबाईलवरून संपर्क साधून पिंपरी चिंचवड येथे 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुण्यात होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य अधिवेशनासाठी सातारा मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद सज्ज
सांगलीच्या नऊ वर्षांच्या प्रांजल बावचकर या चिमुरडीने सर केला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला मोरोशीचा भैरवगड

या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य चंद्रसेन जाधव डिजिटल मीडियाचे जिल्हा खजिनदार प्रशांत जगताप,सदस्य संदीप शिंदे,विश्वास पवार,विनीत जवळकर,विठ्ठल हेंद्र,डिजिटल मीडियाचे शहराध्यक्ष प्रतीक भद्रे,उपाध्यक्ष साई सावंत,सचिव गुरुनाथ जाधव,खजिनदार अमोल निकम,महेश पवार,प्रमोद इंगळे,रिजवन सय्यद,महेश क्षीरसागर, सचिन सापते,शुभम गुजर,तसेच साताऱ्यातील अनेक पत्रकार बांधव प्रमुख उपस्थिती होती.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com