सतीश भोसले उर्फ खोक्याचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
बीडमधील सतीश भोसलेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बीडमध्ये सतीश भोसले याने एका व्यक्तीला बॅटच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सतीश भोसले याचा कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातच पुन्हा एकदा सतीश भोसले याचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये तो शाळेतील मुलांसमोर धमकी देताना दिसत आहे.
सतीश भोसले यावर गुन्हा दाखल झाला आहे मात्र सतीश भोसले हा अद्याप फरार आहे. याच पार्श्वभूमीवर आता फरार सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सतीश भोसले याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत यासाठी आता सतीश भोसलेने न्यायालयात धाव घेतली आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून याची सुनावणी 12 मार्च रोजी होणार असल्याचं वकील शशिकांत सावंत यांनी सांगितले आहे.