Satish shah Dead : सतीश शहा यांच्या निधनाच्या अर्धा तास नेमकं काय झाल?
Satish shah Dead : सतीश शहा यांच्या निधनाच्या अर्धा तास नेमकं काय झाल? : मॅनेजरने सांगितलं सर्व सत्यSatish shah Dead : सतीश शहा यांच्या निधनाच्या अर्धा तास नेमकं काय झाल? : मॅनेजरने सांगितलं सर्व सत्य

Satish shah Dead : सतीश शहा यांच्या निधनाच्या अर्धा तास नेमकं काय झाल? : मॅनेजरने सांगितलं सर्व सत्य

सतीश शहा काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या समस्यांनी त्रस्त होते. 25 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी सतीश शहा यांचं निधन झालं.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं.

  • त्यांच्या निधनाच्या अर्धा तास आधी नेमकं काय घडलं याबद्दल त्यांच्या मॅनेजरने माहिती दिली आहे.

  • 25 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी सतीश शहा यांचं निधन झालं.

ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाच्या अर्धा तास आधी नेमकं काय घडलं याबद्दल त्यांच्या मॅनेजरने माहिती दिली आहे. सतीश शहा काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या समस्यांनी त्रस्त होते. 25 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी सतीश शहा यांचं निधन झालं. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. आज (रविवार) मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

सतीश शहा यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी एएनआयला सांगितले की, "गेल्या दुपारी जेवताना हे सर्व घडलं. पावणे दोन वाजता ते जेवायला बसले होते. एक घास घेताच ते बेशुद्ध झाले. रुग्णवाहिका अर्ध्या तासाने आली, पण रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आलं."

सतीश शहा काही दिवसांपूर्वी कोलकात्यात किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला होता, पण नंतर ते घरी परतले होते. त्यांच्या मित्र आणि अभिनेते राकेश बेदी यांनी सांगितलं की, सतीश यांना हृदयाशी संबंधित समस्या देखील होत्या, आणि किडनी ट्रान्सप्लांटामुळे त्यांच्या शरीराला ते सहन झालं नाही.

सतीश शहा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंकज कपूर, रत्ना पाठक, सुप्रिया पाठक, नसीरुद्दीन शाह, दिलीप जोशी, रुपाली गांगुली, राजेश कुमार, अनंग देसाई आणि फराह खान यांसारखे मोठे कलाकार उपस्थित होते. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com