Satyajeet Tambe : देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे, देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे

Satyajeet Tambe : देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे, देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. सत्यजीत तांबे यांनी सहकुटुंब मतदान केले आहे. संगमनेरमध्ये मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपल्या देशामध्ये सध्या लोकशाहीचं निवडणुकीचं वार सुरु आहे. आज महाराष्ट्रातील चौथा टप्प्यातील निवडणूका होत आहेत. देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे. कारण देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे.

यासोबतच ते म्हणाले की, ही कुठल्याही नगरपालिकेची, जिल्हापरिषदेची किंवा स्थानिक पातळीवरची निवडणूक नसून देशाची निवडणूक आहे. कुठलाही कंटाळा न करता आपण सगळ्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे. देशाचं पुढचं भविष्य कसं असणार आहे. देशाची आर्थिक धोरणं कशी असणार आहेत. कृषीधोरण कसे असणार आहे. या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या माध्यमातून होणार आहे. असे सत्यजित तांबे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com