सत्यजित तांबे भाजपला सोडचिठ्ठी दिलेले अद्वय हिरे यांच्या भेटीला जाणार

सत्यजित तांबे भाजपला सोडचिठ्ठी दिलेले अद्वय हिरे यांच्या भेटीला जाणार

सत्यजित तांबे भाजपला सोडचिठ्ठी दिलेले अद्वय हिरे यांच्या भेटीला जाणार आहेत.

सत्यजित तांबे भाजपला सोडचिठ्ठी दिलेले अद्वय हिरे यांच्या भेटीला जाणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीला मतदानाचा निकाल समोर येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेगळेच वळण यायला लागले आहे.

अद्वय हिरे हे शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याचं निश्चित झालंय. त्यानंतर आता सत्यजित तांबे हिरे कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलीय. आपण अद्वय हिरे यांनादेखील भेटणार असल्याचं विधान स्वत: सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काल सत्यजित तांबे यांनी मालेगावात कार्यकर्ते व मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी पीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर डी निकम यांचीही भेट घेतली. काही दिवसांपूर्वी मालेगाव परिसरात शेतकऱ्यांकडून मोठे जण आंदोलन उभारण्यात आले होते. 3 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. मात्र त्यावरही फडणवीस यांनी काहीही उत्तर दिले नव्हते. मालेगावात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भाजप आणि शिंदे गटाने कुठेही दखल घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधला रोष वाढत होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com