अमेरिकेमध्ये पुन्हा शाळेत गोळीबार; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Admin

अमेरिकेमध्ये पुन्हा शाळेत गोळीबार; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये पुन्हा शाळेत गोळीबार झाला आहे.

अमेरिकेमध्ये पुन्हा शाळेत गोळीबार झाला आहे. अमेरिकेच्या राज्य आयोवामधील युथ आउटरीच सेंटरमध्ये सोमवारी एका माथेफिरूने गोळीबार केला. स्टार्ट्स राइट हियर स्कूलमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक शिक्षिका आणि 2 विद्यार्थ्यांवर गोळीबार केला होता. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान या दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

या गोळीबारामध्ये शाळेतील एक कर्मचारी सुद्धा जखमी झाला आहे. गोळीबार कुणी आणि का केला या प्रकरणाच तपास पोलीस करत आहे. 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com