Rohit Pawar Latest News
Rohit PawarTwitter

Rohit Pawar: गळक्या एसटीचा VIDEO ट्वीट करून राज्य सरकारला धरलं धारेवर; रोहित पवार म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शाळकरी मुलांच्या एसटी बस प्रवासाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
Published by :

Rohit Pawar Tweet: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शाळकरी मुलांच्या एसटी बस प्रवासाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. गळक्या बसमध्ये विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. रोहित पवारांनी प्रवाशांच्या समस्येबाबत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीला गळती लावून सामान्य नागरिकांना गळकी बस देणाऱ्या या सरकारलाच गळती लावून उघड्यावर आणल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार ट्वीटरवर काय म्हणाले?

राज्यात काय चाललंय, हे एसीत बसून गप्पा करणाऱ्या, कमिशन खोरी आणि दलाली खाण्यात व्यस्त असणाऱ्या सरकारला कसं कळणार? सरकार कशाप्रकारे काम करतंय याचं बोलकं उदाहरण म्हणजे गडचिरोली जिह्यात शाळकरी मुलांना नेणारी ही गळकी बस. राज्याच्या तिजोरीला गळती लावून सामान्य नागरिकांना मात्र गळकी बस देणाऱ्या या सरकारलाच गळती लावून उघड्यावर आणल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com