Narak Chaturdashi Marathi Wishes : यंदाची दिवाळी पहाट प्रेमाने उजळवा! नरक चतुर्दशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Narak Chaturdashi Marathi Wishes : यंदाची दिवाळी पहाट प्रेमाने उजळवा! नरक चतुर्दशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

यंदा नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबरला आहे. दिवाळी पहाट आणि नरक चतुर्दशीनिमित्त आपल्या प्रियजनांना Whatsapp Status, Facebook द्वारे पाठवा 'या' खास शुभेच्छा पाठवा...
Published by :
Prachi Nate
Published on

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा सण. पण या उत्सवाची सुरुवात जी खास पारंपरिक दिवशी होते. ती म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटे उठून उटणे लावणे, अभ्यंगस्नान करणे आणि एक विशेष रीत म्हणून कारीट नावाचं कडवट फळ पायाने फोडले जाते. यंदा नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबरला आहे. दिवाळी पहाट आणि नरक चतुर्दशीनिमित्त आपल्या प्रियजनांना Whatsapp Status, Facebook द्वारे पाठवा 'या' खास शुभेच्छा पाठवा...

नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला,

अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला,

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला,

सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो,

तुम्हाला नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा!

दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,

दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा,

आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

नरक चतुर्दशी दिनी,

अभ्यंग स्नान करुनी,

दीप उजाळुनी,

आपणास व आपल्या परिवारास नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

दिवाळी म्हणजे परंपरेचा उत्सव,

सुख-समृद्धीचा संदेश आणि घरात आनंदाची गोडी

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com