anjali damania on walmik karad
anjali damania on walmik karad

Walmik Karad ठणठणीत, ताबडतोब ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी करा - अंजली दमानियांची मागणी

वाल्मिक कराड ठणठणीत आहे, त्याची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
Published by :
Published on

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण आणि खंडणीप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीवरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोर्टाकडून जामीन मिळवण्याकरता वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल केले गेले असल्याचा विरोधकांचा दावा आहे. तर, आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी आज एक व्हिडिओच जारी केला आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमावरून आज एक नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अंजली दमानिया म्हणत आहेत की, "वाल्मिक कराड ठणठणीत आहेत. खंडणी मागतांना, जीवे मारण्याच्या धमक्या देतांना, अगदी ठणठणीत होते ना? मग अशांना दया माया कशासाठी?" असं एक्सवर त्यांनी म्हटलं आहे.

तर पुढे व्हिडिओ पोस्ट करत त्या म्हणाल्या, "सर्व गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल. मेडिकल ग्राऊंड्सवर कराडसारख्या ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयूमध्ये अॅडमिट केल्याचं दाखवलं आहे. त्याला काहीही झालं नाहीय. खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना तो ठणठणीत होता ना. अशा लोकांना कुठलीही दया माया न दाखवता काल ज्या टेस्ट झाल्या आहेत, त्याचे अहवाल सार्वजनिक करा. ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. दोन तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून ते ठणठणीत असल्याची खात्री करून कराडला ताबडतोब ऑर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे.”

दरन्यान, वाल्मीक कराडला बुधवारी रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाल्मीक कराडला स्लिप ॲप्निया नावाचा आजार असून त्याची देखील तपासणी करण्यात आली आहे. कराडला ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲप्निया प्रकारचा आजार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.बी.राऊत यांनी दिली आहे. यानंतर सिटी स्कॅनचा अहवाल डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती डॉ. एस.बी.राऊत यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com