ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन
जेष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येणार आहे.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं.
बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचं शिक्षण घेतलं. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज यांनी श्री सदगुरु दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायला सुरुवात केली होती. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची परंपरा जोपासली जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबा महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी भक्त जमत होते.