Pune : पुण्यात मालकाच्या घरात नोकराने केली 'इतक्या' लाखांची चोरी
पुणे: ऑनलाईन रम्मी खेळण्यासाठी पुण्यातील एका नोकराने मालकाच्या घरातून तब्बल ३८ लाखांची चोरी केली आहे. या चोरी प्रकरणी मनीष जिवनलाल रॉय या चोरट्याला चतुशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. सोशल माध्यमावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रम्मीअॅप आहेत. या रम्मी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन रमी खेळत मालकाच्या घरातून तब्बल 38 लाख रुपयांची चोरी या आरोपीने केली आहे.
मनीष हा मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. फेसबुकवर येणाऱ्या जाहिरात बघून तो रम्मी खेळू लागला. सुरवातीला तो पैसे जिंकला आणि त्याला रम्मी खेळण्याचे व्यसन लागले. रम्मी खेळण्यासाठी त्याने काम करत असलेल्या त्रंबकराव पाटील यांच्या घरातील तब्बल ३८ लाखांची चोरी केली. पोलिस चौकशीत आरोपीच्या खात्यात लाखो रुपये भरलेले पोलिसांना आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने चोरीची कबुली दिली आहे.