राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

धुळ्यातून राईनपाडा हत्याकांड प्रकरणी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.

या प्रकरणात राज्य विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज उज्वल निकम यांच्या उपस्थितीत न्यायालयाने निकाल देत सात आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

समाज माध्यमांमधे चुकीची बातमी पसरवल्याने 1 जुलै 2018 रोजी पिंपळनेर मधील राईनपाडा येथे पाच भिक्षेकरुंची जमावाने ठेचून हत्या केली होती. यातील काही जणांची निर्दोष मुक्तता देखील करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com