नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहात.

नवी मुंबई कोपरखैरणे येथील पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. भारत इंडस्ट्रीयल असे कंपनीचे नाव असून आग कशामुळे लागली अद्याप समजले नाही. मात्र, आग लागताच ताबडतोब घटनास्थळी नवी महानगरपालिका अग्निशमन दलाची आणि एमआयडीसीची अशा 3 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून यामध्ये जीवित हानी झाली नसून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न शर्यतीने करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com