पुण्यात नवरात्रीत 'लवयात्री'? भर नवरात्रीत लैंगिक शिक्षणाचा धक्कादायक प्रकार

पुण्यात नवरात्रीत 'लवयात्री'? भर नवरात्रीत लैंगिक शिक्षणाचा धक्कादायक प्रकार

सांस्कृतिक वारसा लाभलेले पुणे शहर. पुण्यात वेगवेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपला जातो. मात्र याच सांस्कृतिक वारसा असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चंद्रशेखर भांगे, पुणे

सांस्कृतिक वारसा लाभलेले पुणे शहर. पुण्यात वेगवेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपला जातो. मात्र याच सांस्कृतिक वारसा असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तरुणाईला लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्यम शिवम सुंदरम नावाच्या फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाने या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकिंग केले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

सध्या याच संदर्भातील एक जाहिरात आणि मेसेज सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या लैंगिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यात तरुण - तरुणी सहभाग घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या लैंगिक प्रशिक्षण केंद्रात ध्यानधारणा कशी करावी आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सांस्कृतिक वारसा असलेल्या या पुणे शहरात असला प्रकार घडणे कितपत योग्य आहे. यापूर्वी कधीच अशी घटना घडली नव्हती. तसेच या सर्व प्रकरणाचा आता पुणे पोलीस कसा तपास करतील आणि सत्यम शिवम फाउंडेशनच्या सूत्रधाराला शोधतील का? असा प्रश्न आता पुणेकर उपस्थित करत आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com